जागतिक महिला दिनानिमित्त वैजापुरात सफाई कामगार महिलांचा सन्मान

वैजापूर ,​८​ मार्च / प्रतिनिधी :- सामाजिक बांधिलकी जपत येथील  सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत व पालिकेतील स्वछता विभागाचे कर्मचारी प्रमोद निकाळे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी बुधवारी (ता.08) प्रातिनिधिक स्वरूपात काही सफाई कामगार महिलांना गुलाब पुष्प,शाल व धोंडीराम राजपूत यांच्या “पालखी “नावाचे कविता संग्रह पुस्तक देऊन यथोचित सन्मान केला. 

सफाई कामगार महिला मंगलबाई त्रिभुवन, छाया बागुल, ज्योती त्रिभुवनभाग्यश्री आल्हाट, अल्काबाई आव्हाड, शारदाबाई अस्वले, रेखाबाई त्रिभुवन, ताईबाई त्रिभुवन यांचा सन्मान करण्यात आला. आरंभी शिक्षणाची आराध्य दैवत सावित्री बाई फुले  यांच्या प्रतिमेला मंगलबाई व ज्योती त्रिभुवन यांनी पुष्पहार टाकून अभिवादन केले. राजपूत यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत या सफाई  कामगार महिलांनी कोरोना काळात  स्वछता व सफाई  बाबत दक्ष राहून कोरोना रुग्णांची केलेली सेवा याबद्दल त्यांचे अभिनंदन केले तसेच महिलांना स्वतः च्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले.  याप्रसंगी प्रमोद निकाळे, रमेश त्रिभुवन, विष्णु आलूले, राहुल बनकर, कैलास त्रिभुवन, शेख अहमद, चेतन निखाडे, संजय त्रिभुवन,रमेश त्रिभुवन यांनी सहभाग नोंदविला.