बोरसर येथे वीज पडून कांदा चाळ भस्मसात : दीडशे क्विंटल कांद्याचे नुकसान

वैजापूर ,​७​ जून/ प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील बोरसर येथे वीज पडुन शेतकऱ्याची कांदा चाळ भस्मसात झाल्याची घटना सोमवारी घडली.‌ सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.

बोरसर येथील गट क्रमांक ३०३ मध्ये वीज पडुन ज्ञानेश्वर रामराव कानडे यांच्या शेतातील कांद्याच्या चाळीला आग लागली. या घटनेत सुमारे १५० क्विंटल कांद्याचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. आधीच कसाबसा वाचवलेला कांदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तलाठी संजय काळे, कृषि‌ सहायक बाविस्कर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.