जळगाव – हडसपिंपळगाव रस्त्यावर वाळू भरलेली हायवा चिखलात फसली अन ग्रामस्थांनी पकडली

वैजापूर,१३ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या एका हायवा चालकाविरुद्ध पोलीसात गून्हा दाखल करण्यात आला आहे. चिखलात हायवा फसल्याने ही चोरी उघडकीस आली.तालुक्यातील जळगाव ते हडस पिंपळगाव रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.
जळगाव ते हडस पिंपळगाव रस्त्यावर वाळूने भरलेली हायवा (एम  एच. 20 ए. एल.2197) ही गाडी रस्त्यावरील चिखलात फसली. या गाडी चालकाने वाळू चोरुन चालल्याचे पोलीसांच्या लक्षात आले. सदर हायवा व त्यामध्ये भरलेली चार ब्रास वाळू असा एकूण 6 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.  या प्रकरणी पोलिस नाईक रावसाहेब रावते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सतीश बबन म्हस्के रा.रांजणगाव शेणपुंजी याच्याविरुद्ध वैजापूर पोलिस  ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार निकाळजे हे करीत आहेत.