महिला दिनाच्यानिमित्ताने लोकविकास महिला प्रतिष्ठान वैजापूरच्या वतीने सातशे कर्तृत्ववान ​महिलांचा सन्मान

वैजापूर ,​८​ मार्च / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील कोरोना काळात आपले कर्तव्य सांभाळून ज्या समर्पण सेवेने स्वतःला झोकून सामाजिक जाण ठेवत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अंगणवाडी सेविका,आरोग्य सेविका,आशा वर्कर्स, सरपंच व सामाजिक कार्यकर्त्या महिलांनी रुग्ण सेवा व समाजसेवा केली याची दखल घेत येणाऱ्या महिला दिनाचे औचित्य साधत जवळपास  सातशे कर्तृत्व संपन्न महिलांचा ‘सन्मान आपल्या कर्तृत्वाचा आणि समर्पण सेवेचा’ याअंतर्गत लोकविकास प्रतिष्ठान वैजापूरच्या वतीने सन्मानपत्र व साडी चोळी देऊन तसेच स्नेहभोजन देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास आयोजक श्रीमती हर्षला एकनाथ जाधव, एकनाथ जाधव, हभप मनिषाताई बिडाईत, नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, आनंदीताई अन्नदाते यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुरुवातीला या स्त्री शक्ती पिठावर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती च्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करून द्वीप प्रज्वलित करण्यात आले. महिलांनी जीवनातील चढउताराना खंबीर व समर्थपणे सामोरे जावे, मनाने खचून न जाता धीरोदात्तपणे संयम व सामंजस्य पणेअडचणी व समस्यांवर मात करावी. भारतीय संस्कृती व संस्काराची जपवणूक राजमाता जिजाऊ प्रमाणे करून मुलां-मुलींवर योग्य संस्कार करावे असे प्रतिपादन हभप बिडाईत यांनी यावेळी बोलताना केले. नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी यांनीही  महिलांना संबोधित करतांना, नारी शक्ती ने आदीशक्ती बनून समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा व अन्याय -अत्याचाराचे विरुद्ध खंबीरपणे लढा देऊन स्त्री शक्तीचा जागर दाखवून द्यावा असे विशद केले.प्रास्ताविक व सूत्र संचलन धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले तर आभार आयोजक एकनाथ जाधव यांनी मानले.

मनोगत माया म्हके यांनी व्यक्त केले. याप्रसंगी नगरसेविका शोभा भुजबळ, जयश्री राजपूत, माधुरी बनकर, सुप्रिया व्यवहारे, डॉ. प्रीती भोपळे, पद्मा टेके,  अलका साखरे, मंदा तांबे, अनुराधा पवार, सपना पवा यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास कैलास पवार, दिनेश राजपूत, शैलेश पोंदे, प्रेम राजपूत यांच्यासह बाळासाहेब गायकवाड, शंतनू संतपाळ, बाबा चन्ने, सचिन मोरे, शशिकांत निकाले, सम्राट राजपूत, अनिल गायके, सुमित रामैय्या, सविता राजपूत, ज्योती सोमवंशी, सविता पुणे, कल्पना पवार, ज्योती हंगे यांनी सहभाग नोंदविला.