आषाढी एकादशी व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर वैजापुरात पोलिसांचे पथ संचलन

वैजापूर ,२१ जून/ प्रतिनिधी :-  आषाढी एकादशी व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता.21) वैजापूर शहरात पोलिसांनी पथ संचलन केले. सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली शहरातील मुख्य रस्त्यावरून हे पथ संचलन करण्यात आले.

पोलीस निरीक्षक संजय लोहकरे याच्यासह पोलीसांचा ताफा या पथ संचलनात सहभागी झाला होता. शहरातील कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी यास्तव हे पथ संचलन करण्यात आले अशी माहिती पोलीस निरीक्षक लोहकरे यांनी दिली. या प्रसंगी शांतता समिती सदस्य धोंडीरामसिंह राजपूत, सखाहरी बर्डे, हाजी अकिल शेठ, पालिकेचे उप मुख्याधिकारी राहुल साठे, मिलिंद साठे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.