वैजापूर येथे अमृत महोत्सव सोहळ्यात रंगले ‘कवी संमेलन’

वैजापूर ,२१ जून/ प्रतिनिधी :- जेष्ठ कविवर्य डी.बी.जगत्पुरिया यांच्या अमृत महोत्सवी गौरव सोहळ्यानिमित्त वैजापूर येथील मराठा सेवा संघाच्या राजमाता जिजाऊ माँ साहेब सभागृहात मराठवाडा, विदर्भ व खान्देश मधील निमंत्रित कवींचे कवी संमेलन अत्यंत बहारदारपणे रंगले.

कवयित्री शमा बडे यांच्या कवितेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. गजानन सोनुने, विनोद सिनकर यांनी अनुक्रमे मैत्री व पर्यावरणवर कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. वैजापूरचे जेष्ठ कवी  धोंडीरामसिंह राजपूत यांनी जागतिक पितृदिन चे औचित्य साधत आज कुटुंबात होणारे बापाचे वास्तव चित्र “बाप” या कवितेतून सादर केले. कविवर्य डी.बी. जगतपुरीया यांनी देशावर कविता सादर केली. संमेलनाचे अध्यक्ष विनय मिराशे यांनीही कविता सादर केली. तर सूत्र संचलक शिवाजी जबरे यांनी आपली रचना सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली. के.जे.त्रिभुवन यांनीही आपली रचना सादर केली. याशिवाय डॉ.बलराज पांडव, भाऊसाहेब मिस्त्री, दीपक ढोले, के.व्ही.सरवदे यांनीही आपल्या रचना सादर केल्या.