वैजापूर येथे मतदार संपर्क अभियाननिमित्त २४ जूनला काँग्रेसची आढावा बैठक

वैजापूर ,२२ जून/ प्रतिनिधी :-  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार मतदार संपर्क अभियानअंतर्गत बुथ कमिटी व मंडळ समिति निवडीसाठी वैजापूर तालुका कांग्रेस कमिटीची आढावा बैठक शुक्रवारी येथे आयोजित करण्यात आली आहे.

जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ कल्याणराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीस ग्रामीण जिल्हा कॉंग्रेस कमिटी प्रभारी मुजाहिद्द खान, मतदार संपर्क अभियान समन्वयक हेमंत ओगले (सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) प्रदेश सेवादलाचे अध्यक्ष विलास बापु औताडे, माजी आमदार सुभाष झांबड व माजी.नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती यांची प्रमुख  उपस्थिती राहणार आहे. 

बाजार समितीच्या सेल हॉलमध्ये सकाळी अकराला ही बैठक होणार असून तालुक्यातील कॉंग्रेस पक्षाचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्यासंख्येने बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पाटील तांबे, तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ व शहराध्यक्ष काझी अब्दुल मलिक यांनी केले आहे.