वैजापूर येथे संविधान युवा मंचच्या पुढाकाराने वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना वही पेन वाटप

वैजापूर ,​५​ जुलै / प्रतिनिधी :-विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीसाठी अभ्यासात सातत्य बाळगण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी यांनी केले. येथील संविधान युवा मंच वैजापूर यांच्या पुढाकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीदिनी  ‘एक वही एक पेन’ अभियान राबविण्यात आले होते. संकलित केलेले वही पेन शहरातील मदर तेरेसा वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मंगळवारी (ता.04) वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी होते. माजी उपनगराध्यक्ष अकील शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

भाजपाचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत, नगरसेवक शैलेश चव्हाण, बाजार समितीचे संचालक प्रशांत त्रिभुवन, काँग्रेसचे अनुसूचित जाती जमाती सेलचे  तालुकाध्यक्ष साहेबराव पडवळ, सहायक पोलीस निरीक्षक विजय नरवडे, प्रा.आबासाहेब कसबे, समता परिषदेचे पुंडलिक गायकवाड, संतोष त्रिभुवन, राजवीर त्रिभुवन, मदर तेरेसा वसतिगृहाचे संचालक अण्णासाहेब ठेंगडे आदींच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संविधान युवा मंचचे अध्यक्ष जीवन पठारे, कार्याध्यक्ष बाळासाहेब त्रिभुवन, सचिव लहानू त्रिभुवन, उपाध्यक्ष राहुल त्रिभुवन, श्रीकांत जाधव, प्रवीण शिंदे, ऋषिकेश त्रिभुवन, अंकुश त्रिभुवन,  विशाल त्रिभुवन आदींनी परिश्रम घेतले. या प्रसंगी साहेबराव पडवळ, बाजार समितीचे संचालक प्रशांत त्रिभुवन, प्रा.कसबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवडे आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रमोद पठारे यांनी केले