वैजापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लोहकरे यांची बदली ; श्यामसुंदर कौठाळे नवीन पोलिस निरीक्षक

अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद करू – पोलिस निरीक्षक  कौठाळे 

वैजापूर ,​५​ जुलै / प्रतिनिधी :-वैजापूर पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी शामसुंदर कौठाळे यांनी बुधवारी पदभार स्वीकारला.‌ प्रभारी पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांची औरंगाबाद येथील सायबर विभागात बदली झाल्याने त्यांच्या जागी कौठाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कौठाळे यांनी यापुर्वी गडचिरोली, मुंबई, जालना येथे विविध विभागात काम केले असून जालना जिल्ह्यातील परतुर व चंदनजिरा पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावल्यानंतर ते वैजापूर येथे रुजु झाले आहेत.

शामसुंदर कौठाळे

पोलिस खात्यात 25 वर्ष उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना पोलिस महासंचालकाचे पदक मिळाले आहे. वैजापूर येथे रुजु झाल्यानंतर येथील अवैध व्यवसाय पुर्णपणे बंद करु तसेच वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करु असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

वैजापूर तालुका पत्रकार संघाचे शिष्टमंडळाने कौठाळे यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी संघाचे अध्यक्ष सुनील त्रिभुवन, किरण राजपूत, अशोक बोराडे, मकरंद कुलकर्णी, मन्सुर आली, बाबासाहेब धुमाळ, रियाजोद्दिन शेख, दिपक बरकसे, गौरव धामणे, विलास म्हस्के, विशाल त्रिभुवन, विजय त्रिभुवन यांची उपस्थिती होती.