वैजापूर ग्रामपंचायत निवडणूक : मतदान अधिकारी – कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

ग्रामपंचायत निवडणूकसाठी नियुक्त अधिकाऱ्यांनी अत्यंत दक्षतेने कर्तव्य पार पाडावे – तहसीलदार राहुल गायकवाड

वैजापूर, ९ डिसेंबर / प्रतिनिधी :-येत्या 18 डिसेंबर रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच व सदस्य निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया अत्यंत दक्षतेने व कर्तव्य दक्षतेने पार पाडावी.  अशा सूचना तहसीलदार राहुल गायकवाड यांनी प्रशिक्षण कार्यक्रमात मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.

पंचायत समितीच्या स्व. विनायकराव पाटील सभागृहात आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमात  प्रशिक्षण प्रमुख धोंडीरामसिंह राजपूत यांनी दोन सत्रात हे प्रशिक्षण दिले. ई.व्ही.एम.प्रक्रिया व मतदान अधिकारी व मतदान केंद्राध्यक्ष यांनी पार पाडायची कर्तव्ये या विषयी प्रशिक्षण देऊन मतदान प्रक्रिया विषयी माहिती त्यांनी दिली. यावेळी सरपंच याची निवड थेट जनतेतून होणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी मनीष दिवेकर, बाळासाहेब म्हस्के यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी व मास्टर ट्रेनर यांची  उपस्थिती होती.