प्रा. आबासाहेब कसबे यांना पीएचडी पदवी प्रदान

औरंगाबाद,१३ जुलै /प्रतिनिधी :-येथील विनायकराव पाटील महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागातील प्राध्यापक तथा सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार प्रा.आबासाहेब कसबे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्याकडून पीएचडीची पदवी प्रदान करण्यात आली.

त्यांनी ‘आघाड्यांच्या राजकारण आंबेडकरी राजकीय पक्षांच्या भूमिकेचा अभ्यास संदर्भ-1989-2015’ याविषयावर डॉ.एल.यु.मेश्राम (राज्यशास्त्र विभाग प्रमुख, पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालय औरंगाबाद) यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन कार्य पुर्ण केले.काल झालेल्या ऑनलाईन मौखिक परिक्षेत बहिस्थ परिक्षक म्हणून डॉ विशाल पतंगे (प्राध्यापक पिपल्स महाविद्यालय नांदेड)तर डॉ शुजा शाकिर (राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद) यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

त्यांच्या या यशाचे श्री.भाऊसाहेब काका ठोंबरे, आमदार सतीश भाऊ चव्हाण, डॉ.दिनेशभाऊ परदेशी, बाळासाहेब संचेती, विशाल संचेती, प्रशांत सदाफळ, रामहरी बापू जाधव, कृषीभूषण अप्पासाहेब पाटील, मुप्टा शिक्षक संघटनेचे प्रा.सुनील मगरे, ॲड.प्रमोद दादा जगताप, ॲड.देवदत्त पवार, श्री.उल्हास ठोंबरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजीराव थोरे, उपप्राचार्य डॉ दादासाहेब साळुंके,उपप्राचार्य डॉ एसडी परदेशी, डॉ.सुनील डहाळे, डॉ.विजयकुमार परसोडे, डॉ.सोमेश्वर बाबर, डॉ.शेषराव राठोड, डॉ.सचिन कुमावत, डॉ.ज्ञानेश्वर खिल्लारी, डॉ.जयंत सोनार, डॉ.साहेबराव हिवाळे, डॉ.बळीराम धापसे,प्रा.विश्वनाथ डोके,प्रा.राहुल परदेशी,प्रो.परसराम शेळके, डॉ.राहुल साठे  रजिस्ट्रार श्री.विजय आहेर, दिपक टिळेकर, यांच्यासह   ,मुप्टा शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास त्रिभुवन, तालुकाध्यक्ष गणेश बोर्डे यांच्यासह मित्र परिवार  आदिनी त्यांचें अभिनंदन केले आह