वैजापुरात शहीद दिनानिमित्त रक्तदान करून शहिदांना अभिवादन

वैजापूर ,२३ मार्च / प्रतिनिधी :- शहीद भगतसिंह संधू, शहीद सुखदेवसिंग थापर व शहीद शिवराम हरी राजगुरू क्रांतिवीरांना 23 मार्च1931 रोजी जुलमी ब्रिटिश राजवटीने फाशी दिली म्हणून दरवर्षी 23 मार्च हा दिन शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्त या क्रांतिवीरांना अभिवादन करतात. गेल्या 16 वर्षांपासून वैजापुरात  या शहिदांना राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती व शिवराणा विचार मंच यांच्यावतीने अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.  गुरुवारी (ता.23) येथील ठक्कर बाजार परिसरात रक्तदान शिबीर आयोजित करून या क्रांतिवीरांना अभिवादन करण्यात आले. आयोजक रियाज खान पठाण व सतपाल शिवदत्तसिंह राजपूत यांनी रक्तदान करून अभिवादन केले. या समयी व्याख्याते जेष्ठ समाजसेवक धोंडीरामसिंह राजपूत, नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी, सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांनी या क्रांतीवीरांच्या कार्याविषयी माहिती देऊन त्यांच्या राष्ट्रीय व मातृभूमी कार्याला अभिवादन केले. 

या प्रसंगी शिवराणा विचारमंचचे अध्यक्ष राजेंद्रसिंह  राजपुत, दिलीपसिंह राजपूत, भ्रष्टाचार विरोधी जनशक्तीचे रियाज खान, साहिल बॅटरी ग्रुपचे साबेर सय्यद, शेरुभाई मोमीन (येवला), काझी सलीम, शेख शाकेर (येवला), नगरसेवक राजुसिंह राजपूत, मर्चंट बँक चेअरमन विशाल संचेती, पंकज ठोंबरे, संदीप राजपूत, रवींद्रआप्पा साखरे, प्रकाशशेठ बोथरा, जाकीर कुरेशी, दशरथ बनकर, ज्ञानेश्वर सिरसाट, मंजुषा ढाकरे, ज्योती हंगे, जगन राजपूत, अवधूत गिरी महाराज आदींची उपस्थिती होती.  राजेंद्रसिंह राजपूत यांनी केले,आभार राजू पठाण यांनी मानले.