वैजापूर बाजार समिती निवडणुकीसाठी मतदान केंद्राची संख्या वाढवली ; आता आठ मतदान केंद्रावर मतदान
वैजापूर ,२३ एप्रिल / प्रतिनिधी :- येत्या 28 एप्रिल 2023 रोजी होणाऱ्या वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आता आठ मतदान केंद्र असणार आहेत. या निवडणुकीसाठी तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे वैजापूर येथे केवळ एकच मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार होते. त्यामुळे ग्रामीण भागातील मतदारांची गैरसोय होणार होती. यासंदर्भात माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना माहिती दिली. दानवे यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ.पी.एस. खंडागळे यांना पत्राद्वारे मतदान केंद्राची संख्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत होती तशीच ठेवावी अशी मागणी केली. डॉ. खंडागळे यांनी दानवे यांच्या पत्राची दखल घेऊन एक ऐवजी आठ मतदान केंद्रावर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मतदान केंद्र व मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे असणार आहे.
मतदान केंद्राचे नाव एकूण मतदान
1)न्यू हायस्कुल (मुलींचे) सहकारी संस्था -228
फुलवाडी रोड, वैजापूर ग्रामपंचायत -182
व्यापारी -130
हमाल मापाडी -204
————————————————————–
2)जिल्हा परिषद प्राथमिक सहकारी संस्था – 163
शाळा, खंडाळा ग्रामपंचायत – 159
————————————————————-
3)जिल्हा परिषद प्राथमिक सहकारी संस्था -137
शाळा, लोणी खुर्द ग्रामपंचायत – 89
————————————————————-
4)जिल्हा परिषद प्राथमिक सहकारी संस्था -110
शाळा, शिऊर ग्रामपंचायत -124
व्यापारी -162
हमाल मापाडी -322
—————————————————————
5)जिल्हा परिषद प्राथमिक सहकारी संस्था – 213
शाळा, गारज ग्रामपंचायत – 154
—————————————————————
6)न्यू हायस्कूल,दहेगांव सहकारी संस्था – 136
ग्रामपंचायत – 129
—————————————————————
7)जिल्हा परिषद प्राथमिक सहकारी संस्था – 191
शाळा, महालगांव ग्रामपंचायत – 154
—————————————————————-
8)जिल्हा परिषद शाळा सहकारी संस्था – 233
लाडगांव ग्रामपंचायत – 144
—————————————————————–
एकूण मतदान सहकारी संस्था – 1411
ग्रामपंचायत – 1135
व्यापारी – 292
हमाल मापाडी – 526