शिवराई येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व चौकाचे सुशोभीकरण कामाचे आ. बोरणारे यांच्याहस्ते भूमीपूजन

वैजापूर,२७ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील शिवराई येथे आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्या स्थानिक विकास निधीतून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व चौकाचे सुशोभिकरणासाठी 5 लक्ष रुपये मंजुर झाले असून या कामांचे भूमिपूजन सोमवारी (ता.26) आ.रमेश पाटील बोरणारे यांच्या हस्ते झाले.


तसेच संपुर्ण राज्यात चालू असलेल्या लंम्पी स्कीन रोगाचा प्रसार झपाट्याने होत असून गाय, बैल जनावरांना या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी  शिवराई गावात लंम्पी त्वचारोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आयोजित लसीकरणाचे शुभारंभ देखील आ.बोरणारे यांच्याहस्ते करण्यात आले.
लंम्पी त्वचारोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा आजार गोचिड, गोमांशी, डास, माश्या या कीटकांपासून पसरतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपले गोठ्याची फवारणी करून वेळोवेळी स्वच्छ धुवून घ्यावे, वैजापुर तालुक्यातील 70 हजार लसीकरण पैकी आतापर्यंत 30 हजार लसीकरण झाले असून उर्वरित लसीकरण लवकर होणार आहे असे आ.बोरणारे यांनी सांगितले व सर्व डॉक्टरांचे आभार मानले. वैजापूरमध्ये डॉक्टरचे मनुष्य बळ हे कमी असल्यामुळे तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यानी देखील डॉक्टरना मदतीची सहायता करून लसीकरण करून घ्या.असे आवाहनही त्यांनी केले.


यावेळी पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. पी.डी झोड, सहउपआयुक्त डॉ. ए.टी बाभुळगावकर, गटविकास अधिकारी एच.आर बोयनार, डॉ. एस.व्ही आंबे, उपविभागप्रमुख संभाजी पा डांगे, सुरेश पानसरे, प्रकाश आबा चव्हाण, रावसाहेब काका वाघ, सुखदेव पा डांगे, राजेंद्र पा चव्हाण, नंदकुमार जाधव, डॉ गणेश साठे, दादासाहेब गुंजाळ, गोकुळ गुंजाळ, मनोज लालसरे, डॉ बाळासाहेब चव्हाण, योगेश शिंदे, सचिन डांगे, गणेश डिके, शुभम चव्हाण, प्रमोद डांगे, गौरव चव्हाण, आनिल चव्हाण, सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.