पेन्शनर्सचे प्रलंबित प्रश्नासंदर्भात हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडणार – आमदार बोरणारे यांचे आश्वासन

वैजापूर, ६ डिसेंबर / प्रतिनिधी :-राज्यात सरकारी,निमसरकारी, जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित शाळांचे सात लक्ष सेवानिवृत्त कर्मचारी आहेत यांचे अनेक दिवसांचे प्रलंबित प्रश्न येत्या हिवाळी अधिवेशनात लक्ष्यविधी ने मांडून ते मार्गी लागण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करणार असे आश्वासन आ. रमेश पाटील बोरणारे यांनी मंगळवारी (ता.05) पेंशनर्स संघटनेच्याच्या पदाधिकाऱ्यांना  दिले. 

राज्य संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा औरंगाबाद जिल्हा संघटनचे अध्यक्ष वसंतराव सबनीस, सचिव नामदेव घुगे, वैजापूर शाखेचे अध्यक्ष धोंडीरामसिह राजपूत, पैठण शाखेचे कार्याध्यक्ष एस. आर. मोरे व जिल्हा शाखेचे पी. टी. कुलकर्णी यांनी आमदार बोरणारे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी या मागण्याची लक्ष्यवेधी करणार असल्याचे सांगितले. 

या मागण्या केंद्र सरकारी निवृत्त कर्मचाऱ्याप्रमाणे रुपये हजार प्रत्येकी प्रत्येक महिन्याला मिळणे, पेंशनर्सचे उर्वरित सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते त्वरित अदा करावे, 30 जूनला सेवानिवृत्त झालेल्यांना एक जुलै ची वेतनवाढचे आदेश शासनाने काढावे. सेवा निवृतांची मे 2022 ची उपदान व अंशराशिकरण मिळावे, मंत्रालयात पेंशनर्स चा स्वतंत्र विभाग असावा, महागाई भत्याची थकीत रक्कम अदा करावी व राज्यातील जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या पांच तारखेच्या आत सेवानिवृत्ती वेतन मिळावे. या सर्व मागण्या येत्या हिवाळी अधिवेशनात मांडणार असे असे आ.बोरणारे यांनी सांगितले