वैजापुर ग्रामीण २ च्या उपसरंपचपदी दादा श्रीहरी अंभाेरे पाटील यांची बिनविराेध निवड

वैजापूर,२२ मार्च  /प्रतिनिधी :- वैजापुर  ग्रामीण  २ च्या उपसरंपचपदी दादा श्रीहरी अंभाेरे पाटील यांची सोमवारी  निवड करण्यात आली.उपसरंपच  गणपत  पाटील गंलाडे यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे  ही जागा रिक्त होती. उपसरपंच पदासाठी आज मंडळ अधिकारी तोतला, ग्रामसेवक बोबडे व तलाठी पेहरकर यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांची बैठक होऊन उपसरपंचपदी दादा पाटील अंभोरे यांची एकमताने निवड करण्यात आली. वैजापूर ग्रामीण – 2 चे सरंपच,  ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यांचासह नागरीक माेठ्या संख्येने  उपस्थित होते.