वैजापूर शहरात भाजपा स्थापना दिवस उत्साहात साजरा

वैजापूर,६ एप्रिल  /प्रतिनिधी :- वैजापूर शहरात भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस बुधवारी भाजपाचे जिल्हा सरचिटणिस डॉ. दिनेश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी  शहरातून दुचाकी फेरी काढली. फेरीचा समारोप भाजपाच्या संपर्क कार्यालयात झेंडा फडकावुन करण्यात आला.

यावेळी नगरसेवक दशरथ बनकर, डॉ. हेडगेवार पतसंस्थेचे चेअरमन प्रशांत कंगले, कैलास पवार, डॉ.राजीव डोंगरे, भाजपचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत नगरसेवक सुरेश तांबे, शैलेश चव्हाण, गोकुळ भुजबळ, राजेश गायकवाड,  बजरंग मगर, महेश भालेराव, महेंद्र काटकर, ज्ञानेश्वर अदमने, ज्ञानेश्वर इंगळे, व्यापारी आघाडीचे निलेश पारख, शैलेश पोंदे, विनय संचेती, गिरीश चापानेरकर, सन्मित खनिजो, गौरव दोड़े, अमोल गोरक्ष, सोमू सोमवंशी, धनंजय अभंग, प्रदीप चव्हाण, योगेश फुलारे, मंगेश मते, आनंद बोड़खे, सचिन दाढ़े,रोनक पंजाबी, नदीम शेख, हामीद जिलानी, प्रसाद गायकवाड, दीपक पवार, आकाश शिंदे, करण बागुल, शिवा थोरात आदी उपस्थित होते.