वैजापूर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

वैजापूर ,३१ मे /प्रतिनिधी :- वैजापूर येथील लोकमाता युवा प्रतिष्ठानच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 297 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त वैजापूर येथील वीरभद्र मंदिर परिसरात मंगळवारी (ता.31) अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. 
लोकमाता युवा प्रतिष्ठानच्या माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ,दिनेश परदेशी, नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीला
प्रथम अभिवादन केले. लवकरच वैजापूर शहरात अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्यात येईल असे आश्वासन डॉ.दिनेश परदेशी यांनी यावेळी बोलताना दिले. धोंडीराम राजपूत यांनी वीरभद्र महाराज मंदिर परिसरात वृक्षारोपण व कंपाऊंडची मागणी केली असता नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी यांनी लगेच आपल्या भाषणात या परिसरात कंपाऊंड व वृक्षारोपण करून देणार असे शब्द दिले.

सूत्र संचलन  धोंडीरामसिंह राजपूत यानी केले तर आभार गोरख गावडे यांनी मानले.या प्रसंगी नगरसेवक दशरथ बनकर, गणेश खैरे, शैलेश चव्हाण, पारस घाटे, बजरंग मगर, लिमेश वाणी, ज्ञानेश्वर टेके,  बाबुराव गावडे, बाळूभाऊ गावडे, रोहिदास गावडे, सोमनाथ गावडे, सचिन गावडे, नवनाथ गावडे, दिगबर खंडागळे, चांगदेव उघडे, रंगनाथ गावडे, रवी गावडे, साईनाथ मतसागर, प्रशांत शिंदे, श्रीकांत साळुंके, सोन्याबापू गावडे, बी.टी.बुट्टे, किरवडे सर, अशोक चव्हाण, ज्ञानेश्वर सिरसाट यांच्यासह धनगर समाजातील युवक व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. लोकमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठाणचे सर्व युवा कार्यकर्ते यांनी हा कार्यक्रम घडवून आणला.