वैजापूर तालुक्यात ग्रामपंचायतसाठी 73 टक्के मतदान ; मतदारांत उत्साह

वैजापूर,१८ डिसेंबर / प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील 24 ग्रामपंचायतींचे सरपंच व 169 सदस्य निवडण्यासाठी शनिवारी घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत 34 हजार 139 मतदारांपैकी दुपारी साडे तीन वाजेपर्यंत 74 मतदान केंद्रावर सरासरी 72.50 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सरासरी 85.59 टक्के मतदान झाले. 

ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसुन आला. या निवडणुकीत सरपंचपदासाठी निवडणुक लढवणाऱ्या 79 व सदस्यपदासाठी रिंगणात असलेल्या 382 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. 29 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता येथील तहसिल कार्यालयात मतमोजणी करण्यात येणार आहे. गावाचा कारभार कुणाकडे जातो याबाबत मतदारांमध्ये मोठी उत्सुकता असुन निकालाकडे लक्ष लागले आहे‌. तिडी, बेलगाव, गोळवाडीसह अनेक मतदार केंद्रांना वैजापुरचे पोलिस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत व अन्य पोलिसांनी भेट दिली. सर्वत्र शांततेत मतदान झाले असुन कुठेही अनुचित प्रकार घडला नाही अशी माहिती राजपूत यांनी दिली. दरम्यान, सकाळपासुन मतदारांमध्ये मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसुन आला. त्यामुळे सकाळच्या सत्रात बहुतांश मतदान केंद्रावर मतदारांची रांग दिसुन आली. निवडणुक विभागाकडुन मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेसात ते दुपारी दिड या कालावधीत ९ हजार 676 पुरुष व 8 हजार 810 अशा 18 हजार 846 मतदारांनी मतदान केले. त्यानंतर दुपारी साडे तीन वाजेपर्यंत 72.50 टक्के मतदारांनी हक्क बजावला.