तारामती बाफना अंध विद्यालय येथे दंत तपासणी शिबिराचे आयोजन

छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाचा उपक्रम 

छत्रपती संभाजीनगर,२७ जानेवारी / प्रतिनिधी :-छत्रपती संभाजीनगर कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित दंत महाविद्यालय आणि रुग्णालय यांच्याकडून चिकलठाणा औद्योगिक वसाहत मधील तारामती बाफना अंध विद्यालय येथे दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.    

   

या शिबिरामध्ये विद्यालयात शिकत असलेल्या सर्व मुलांची दंत तपासणी करण्यात आली तसेच 3D मॉडेलच्या साहाय्याने मुलांना दात कसे घासावे, दातांची काळजी कशी घ्यायची, किडलेल्या आणि न किडलेल्या दातातील फरक ओळखणे. याबद्दल त्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करून प्रशिक्षित करण्यात आले.            

तारामती बाफना अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कैलास निकम आणि सहकारी शिक्षक यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. या शिबिरास छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाचे डॉ. पल्लवी दिवेकर आणि अंतरवसिता गणेश गुरमे, सत्यजीत इंगोले, चंद्रवीर इंगळे, तय्याबा झरीन, फरीहा शेख, अमोल जाधव, ऋतुजा इंगोले, शामल कामळे, सुमन लाखुले,  सिधांतिका गवळी हे डॉक्टर उपस्थित होते. 

      संस्थेचे अध्यक्ष श्री. रणजित मुळे, सचिव श्री.  पद्माकर मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख आणि अधिष्ठाता डॉ. लता काळे यांचे मार्गर्शनाखाली शिबिर घेण्यात आले.