रोटेगाव परिसरातील फार्मसी कॉलेजमधील प्राध्यापकाचे युवकाशी अनैसर्गिक कृत्य ?

समाज माध्यमावर चित्रफीत व्हायरल ; प्राध्यापकाने ठोकली धूम 

वैजापूर ,१६ जून/ प्रतिनिधी :-वैजापूर शहरानजीक असलेल्या रोटेगाव परिसरातील एका फार्मसी ( औषधी निर्माणशास्त्र महाविद्यालय ) महाविद्यालयातील प्राध्यापकाने चक्क एका युवकासोबत ‘कामलीला’ करून कुकृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कामलीलेची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यामुळे हा खुमासदार चर्चेचा विषय ठरला आहे. आपल्या कुकृत्याची बिंग फुटून चित्रफित व्हायरल झाल्याचे समजताच या ‘कामलोलुप’ प्राध्यापकाने धूम ठोकल्याची शहरात चर्चा आहे. 

  याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर शहरानजीक असलेल्या रोटेगाव परिसरात फार्मसी महाविद्यालय असून येथे औषधी निर्माणशास्त्राचे पदवी व पदविका अभ्यासक्रम शिकविले जातात. याच महाविद्यालयातील एका 55 वर्षीय प्राध्यापकाची वैजापूर शहरातील एका युवकाशी ओळख झाली. ओळख झाल्यानंतर या बहाद्दराने ‘तुला मी फार्मसी महाविद्यालयात प्रवेश देऊन उत्तीर्ण करून देतो’ असे आमिष दाखवून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. या कामलीलेची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यामुळे प्राध्यापकाच्या प्रतापाचे बिंग फुटले. त्याच्या या ‘कर्तृत्वामुळे’ महाविद्यालय प्रशासनासह संस्थाचालकास शरमेने मान खाली घालण्याची नामुष्की ओढवली गेली. प्राध्यापक, शिक्षकांना आजही समाजात आदर व मानाचे स्थान आहे. परंतु या जरठ, वृध्द प्राध्यापकाने युवकासोबत ‘कामुक’ चाळे करून शिक्षकी पेशाला बट्टा लावून समस्त गुरूजींच्या इज्जतीची लक्तरे वेशीवर टांगली आहे. महाविद्यालय प्रशासन या कामलोलुप प्राध्यपकाबाबत काय निर्णय घ्यायचा तो घेईलच. परंतु त्याने आणखी किती युवकांना आमिष दाखवून त्यांच्यासोबत अशा ‘लीला’ केल्या ? हा एक संशोधनाचा विषय आहे. संस्थाचालक,  प्राचार्य व सहकारी प्राध्यापक वृंद या प्राध्यापकाच्या कामलीलेला किती अभय देतात ? हेही येत्या काही दिवसांत स्पष्ट होईलच. समाजात मुली, तरुणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच आता तरुणही सुरक्षित नाही. असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

पोलिसांच्या ‘रडारवर’ महाविद्यालय

दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यामुळे जिल्ह्यात चर्वितचर्वण तर झालेच. त्यामुळे पोलिस यंत्रणेलाही भणक लागल्यामुळे संस्थाचालकांसह प्राध्यापकामागे पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे.