वैजापूर-लाडगांव चौफुलीवर 40 लक्ष रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या सद्गुरू गंगागिरी महाराज प्रवेशद्वार स्लॅब भरणीचा आ.बोरणारे यांच्या हस्ते शुभारंभ

वैजापूर,२३ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- लाडगाव रस्त्यावरील चौफुलीवर 40 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या सदगुरु गंगागिरी महाराज श्रीक्षेत्र सराला बेट प्रवेशद्वाराच्या स्लॅब भरणीचा शुभारंभ तसेच शहरातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये रामगिरीनगर येथे मंजूर झालेल्या 20 लक्ष रुपये खर्चाच्या सामाजिक सभागृह बांधकामाचे भूमीपूजन आ.रमेश पाटील बोरणारे यांच्या हस्ते सोमवारी झाले.

Displaying FB_IMG_1637655517787.jpg

आ.रमेश पाटील बोरणारे व माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.त्यांनी केलेला पाठपुरावा व प्रयत्नाने ही विकास कामे मंजूर झाली असून राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांच्या निधीतून ही कामे होत आहेत.प्रवेशद्वाराच्या स्लॅब भरणीचा शुभारंभ व सामाजिक सभागृहाचे भूमीपूजन आ.बोरणारे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाध्यक्ष सचीन पाटील वाणी, शहराध्यक्ष राजेंद्र पाटील साळुंके, युवासेनेचे आमेर अली, नगरसेवक नीलेश भाटिया, भाऊसाहेब पाटील गलांडे, वसंत त्रिभुवन, अभियंता विशाल साळुंके, सुभाष पाटील शेळके आदी उपस्थित होते.