आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते पवननगर येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन

औरंगाबाद,२३ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत शिवसेना जिल्हाप्रमुख,आमदार अंबादास दानवे यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतुन  महानगरपालिका क्षेत्रात वार्ड क्र.२५ पवननगर प्रभागातील रंजनवन हाऊसिंग सोसायटी येथील  सिमेंट काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन आज आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले.

Displaying IMG-20211122-WA0076.jpg

याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात,जि.प.सदस्य शुभांगी काजे, महिला आघाडी जिल्हासंघटक प्रतिभा जगताप, शिवसेना उपशहरप्रमुख संदेश कवडे,विभागप्रमुख नारायण आघाव,ललित सरदेशपांडे, शाखाप्रमुख ज्ञानेश्वर शेळके मनोहर बनकर,रमेश ईधाटे,किशोर नागरे,चंद्रकांत देवराज,प्रतिक अंकुष,,कौस्तुभ भाले,सागर भारस्कर,राहुल सोनवने,नानासाहेब झिंझुर्डे, विलास सोनवणे विश्वनाथ केळे  सोसायटीचे चेअरमन नारायणराव पाटील, हरसुलकर काका , प्रकाशा अत्तरदे,  सुभाष संचेती, नंदू भाऊ खैरनार, एस. के. जाधव, अजय शिंनगारे, संगीता कुलकर्णी ,माळी आजी, बंन ताई हरसुलकर ताई आदी शिवसैनिक पदाधिकारी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.