वैजापूर येथे होणाऱ्या ब्रम्हलीन गंगागिरी महाराज यांच्या सप्ताह जागेवर सफाईचे काम सुरू

वैजापूर ,१६ जून/ प्रतिनिधी :- श्रीक्षेत्र सराला बेटाचे सदगुरू ब्रम्हलीन गंगागिरी महाराज यांचा १७६ वा अखंड हरिनाम सप्ताह २१ ते २३ जुलै दरम्यान वैजापूर शहरात होणार असून या सप्ताहाच्या नियोजित जागेवर साफसफाईचे काम शुक्रवारपासून सुरू करण्यात आले आहे.

आ.रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत सप्ताह जागेवर साफसफाईचे काम सुरू झाले. याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख राजेंद्र  साळुंके, शहरप्रमुख पारस घाटे, उपतालुकाप्रमुख डॉ. प्रकाश शेळके, संजय पाटील बोरनारे, रणजित चव्हाण, अमोल बोरणारे, वसंत त्रिभुवन, महेश बुणगे, दत्तू खपके, कमलेश आंबेकर, मधुकर त्रिभुवन यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व शहरातील नागरिक उपस्थित होते.