वैजापूर येथे महानिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांना अभिवादन

वैजापूर, ७ डिसेंबर / प्रतिनिधी :- 66 व्या महानिर्वाण दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मंगळवारी (ता.06) वैजापूर येथे अभिवादन करण्यात आले.

शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास  पुष्पहार अर्पण करून विविध राजकीय पक्ष, संघटना व नागरिकांतर्फे अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्ष साबेर खान, उपविभागीय पोलीस अधिकारी महक स्वामी, पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ, शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र पाटील साळुंके, भाजपचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत, उल्हास ठोंबरे, नगरसेवक शैलेश चव्हाण, राजेश गायकवाड, साहेबराव पडवळ, श्रीकांत साळुंके, अमोल बोरणारे, दशरथ बनकर, प्रशांत शिंदे, बाबासाहेब गायकवाड, काझी लईक इनामदार, बबन त्रिभुवन आदी उपस्थित होते.