वैजापूरच्या पोलिस उपअधीक्षक महक स्वामी यांची अवैध धंद्याविरुद्ध धडक कारवाई

वैजापूर,१९ डिसेंबर / प्रतिनिधी :-वैजापूरच्या सहाय्यक पोलिस अधिक्षक महक स्वामी यांच्या पोलिस पथकाने वैजापूर, शिऊर, वीरगाव पोलिस ठाणे हद्दीतील अवैध व्यवसायावर कारवाईचा धडाका सुरु केल्यामुळे स्थानिक पोलिस आणि अवैध व्यावसायिकांची अर्थपूर्ण तडजोडीला सुरुंग लागला आहे.

वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी स्थापन केलेल्या पथकाकडून आठवडाभरात अवैध देशी दारुचा अडीच लाखाचा साठा, मटका कारवाईत 80 हजाराचे मुद्देमालासह साहित्य जप्त केले. जुगार तसेच 21 वर्षाच्या आतील व्यक्तीना तंबाखूजन्य वस्तू विक्रीला मनाई हुकूम असताना पानटपरी व किराणा दुकानातून खुलेआमपणाने गुटखा तंबाखू विकणा-या 15 दुकानचालकांवर पोलीस पथकाने कारवाईचा दडुंका उगारल्यामुळे लहान मोठया व्यावसायिकांनी कारवाईच्या धास्तीने गुटखा विक्री करणे टाळण्याची भुमिका घेतली आहे.

भग्गाव येथे आय पी एस पोलिस अधिकारी महक स्वामी यांनी स्वतः एका किराणा दुकानातील गुटख्याचा साठा विक्री करुन दुकान चालकांवर  गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली. वैजापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी पदावर रुजू झाल्यानंतर सहाय्यक पोलिसअधीक्षक महक स्वामी यांना तीन्ही पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरटयांनी धुमाकूळ घातल्या मुळे त्यांना अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे नियोजन करण्यासाठी थोडा विलंब लागला होता.त्यांच्या कडे कार्यरत पोलिसकर्मचारी विशाल पडळकर, रामेश्वर काळे, अमोल तायडे , गोपाळ जोनवाल, पडिंत यांचे विशेष पथक स्थापन केले आहे. तालुक्यातील वैजापूर, वीरगाव शिऊर या तीन पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारु, मटका, जुगार  व्यवसायावर  पथकाकडून कारवाई केली जात आहे. पथकामुळे स्थानिक पोलिसांचे धाबे दणाणले आहे.