खंडाळा येथील श्रेया भावसार या विद्यार्थिनीचे यश ; स्टोन क्रशरच्या खदाणीत पोहण्याचा सराव करून जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत द्वितीय पारितोषिक

श्रेयाला वडिलांच्या पाठबळामुळे यश – प्रशिक्षक धनंजय भावे

वैजापूर,१९ डिसेंबर / प्रतिनिधी :-जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत कुठल्याही परिस्थितीत यशाचे शिलेदार होण्याचा ठाम आत्मविश्वास मनाशी बाळगलेल्या खंडाळा येथील पंधरा वर्षीय श्रेया कैलास भावसार या विद्यार्थिनीने जिल्हा पातळीवरील जलतरण स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पटकावण्याची दिमाखदार कामगिरी केली. या यशामुळे तिचे विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी ती पात्र ठरली आहे. 

वैजापूरचे करुणा निकेतन शाळेत इयत्ता नववी वर्गात शिकणाऱ्या श्रेयाने जलतरण स्पर्धेसाठी नाव नोंदणी केली होती.बाल वयात तिला वडिलांनी  त्यांच्या विहिरीत पोहण्याचे शिकवले होते.जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेत पोहण्याची स्पर्धा जलतरण तलावात पार पडणार होती. स्पर्धेत यश संपादन करण्यासाठी तिला  नियमित सराव करणे आवश्यक होते. खंडाळा गावात अद्ययावत जलतरण केंद्र नसल्यामुळे गावातील स्टोन क्रेशर  परिसरा दगड उत्खनन केलेल्या खोलगट खदानीतील पाण्यात तिने जीव धोक्यात घालून तिने पोहण्याचा कसून सराव केला.

तिच्या या धडपडीत वडील कैलास भावसार यांचे तिला खंबीर पाठबळामुळे दररोज सकाळी खदानीतील पाण्यात तिने पोहण्याचा नियमितता ठेवली. जलतरणासाठी आवश्यक नियम आणि जलदगतीने पोहण्याचा सराव करण्याचा कौशल्या संदर्भात तिला जलतरणपटू शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे  हवालदार धनंजय भावे, ऋषिकेश भावे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.सिध्दार्थ उद्यानातील जलतरण तलावात पार पडलेल्या स्पर्धेत तिने द्वितीय क्रमांक संपादन केला.शाळेचे मुख्याध्यापक संजय ब्राहमणे, पोलीस हवालदार धनंजय भावे, ऋषिकेश भावे, पालक कैलास भावसार, दिलीप जाधव बाळासाहेब व्यवहारे यांनी सत्कार केला. 

श्रेयाला वडिलांच्या पाठबळामुळे यश मिळाले अशी प्रतिक्रिया प्रशिक्षक धनंजय भावे यांनी दिली. विशेष म्हणजे प्रशिक्षक धनंजय भावे हे पोलिस खात्यात नोकरीला असून समाज कार्यात नेहमीच ते अग्रेसर असतात.