वैजापूर भाजपतर्फे कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार

वैजापूर ,१४ जून  /प्रतिनिधी :- केंद्रातील भाजप सरकारच्या आठव्या वर्षपूर्ती निमित्त सेवा सुशासन आणि गरीब कल्याण पर्व साजरा करण्यात येत असून यानिमित्ताने आज वैजापूर येथे कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार  करण्यात आला. 

भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य एकनाथराव जाधव व जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक दशरथ बनकर होते. सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी करणारे उपजिल्हा रुग्णालयाचे प्रमुख डॉ.गजानन टारपे व त्यांचा सर्व स्टाफ, नगरपालिका रुग्णालयाच्या प्रमुख डॉ.सविता निकाळे व सर्व स्टाफ तसेच नगरपालिका व त्यांच्या स्वच्छता विभागाचा स्टाफ, शहरातील सामाजिक कार्य करणारे ठाकूर धोंडीरामसिंग राजपूत , प्रकाशशेठ बोथरा, हेमंतशेठ संचेती, डॉ.संतोष गंगवाल, राजेश संचेती, सतीश वर्मा, निलेश पारख, नगरसेवक स्वप्निल जेजुरकर, सचिन सोमाणी, सुधीर लालसरे, अनिल शहाणे, साहेबराव पडवळ, वाहेद पठाण, अमोल सोनवणे, मनोज राजपूत यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांचे सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत, नगरसेवक सुरेश तांबे, शैलेश चव्हाण, गणेश खैरे, गोकुळ भुजबळ, ज्ञानेश्वर इंगळे, महेंद्र काटकर, शैलेश पोंदे, धनंजय अभंग, किरण व्यवहारे, प्रदीप चव्हाण, गिरीश चापानेरकर, सनमीतसिंग खनिजो, गौरव दोडे, अमोल गोरक्ष, केशव आंबेकर, शकील तांबोळी, दत्ता खैरे, जाकिर कुरेशी या सर्वांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाकूर धोंडीरामसिंग यांनी केले तर भाजपा शहराध्यक्ष दिनेश राजपूत यांनी उपस्थितांचे मानले.