भालगाव ग्रामपंचायत कार्यालयाचे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते लोकार्पण

वैजापूर ,​९​ जून/ प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील भालगाव ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण श्रीक्षेत्र सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्याहस्ते शुक्रवारी (ता.09) करण्यात आले.

माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज पाटील ठोंबरे यांच्या विशेष प्रयत्नातून जनसुविधा योजना सन 2020-21अंतर्गत भालगांव ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम करण्यात आले आहे. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज पाटील ठोंबरे, माजी पंचायत समिती सदस्य विनायक गाढे, वांजरगावचे सरपंच सलीम पठाण, उपसरपंच जावेद सय्यद, अज्जूभाई पठाणयांच्यासह भालगाव ग्रामपंचायतचे सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.