स्पंदन प्रतिष्ठाणच्या वतीने दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शैक्षणिक मार्गदर्शन

वैजापूर ,​९​ जून/ प्रतिनिधी :- येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.राजीव डोंगरे व डॉ.  विजया डोंगरे यांच्या स्पंदन प्रतिष्ठाणच्या वतीने आरोहण अकॅडमी या शाळेत शहर व तालुक्यातील इयत्ता दहावीच्या परीक्षेत विशेष गुणवता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम शुक्रवारी झाला. 

विद्यार्थ्यांना उत्कृष्ट उच्च शिक्षणासाठी प्रबोधन, मार्गदर्शन व प्रोत्साहित करणारे वक्ते छत्रपती संभाजीनगरचे अंकुश दिगंबर शिंदे यांनी दहावी नंतर च्या शैक्षणिक वाटा वर उपस्थित विद्यार्थी व पालकांना करीअर घडविण्यासाठी मार्गदर्शन केले. या प्रसंगी व्यासपीठावर डॉ. राजीव डोंगरे, डॉ.विजया डोंगरे, माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत व आरोहण इंग्लिश शाळेच्या प्राचार्य श्रीमती बहारखान यांची उपस्थिती होती. डॉ.डोंगरे व शिक्षक सोनवणे यांनी समयोचित भाषणे केली. प्रस्ताविक बहारखान यांनी केले. आभार श्री कोल्हे यांनी मानले. या कार्यक्रमात विद्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते. एस.एस. खिल्लारे, श्री. बढे, कल्पना , श्री. सोनवणे यांनी सहभाग नोंदविला.