नाशिक येथे झालेल्या बस दुर्घटनेबाबत पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून सानुग्रह अनुदान घोषित

नवी दिल्ली ,८ ऑक्टोबर/प्रतिनिधी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात नाशिक येथे झालेल्या बस दुर्घटनेबद्दल शोक  व्यक्त केला  आहे. या अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, असं  पंतप्रधानांनी म्हटलं आहे.पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून बस अपघातातील  मृतांच्या  कुटुंबियांना  2 लाख रुपये आणि  जखमींना  50,000  रुपयांची सानुग्रह अनुदानाची घोषणाही पंतप्रधानांनी  केली आहे

पंतप्रधानांनी ट्विट केले आहे :

“नाशिक येथील बस दुर्घटनेने अतिशय दुःख झाले आहे. या दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.  या अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे: PM @narendramodi”

“नाशिक येथे बसला आग लागल्याने झालेल्या अपघातातल्या मृतांच्या  कुटुंबियांना  2 लाख रुपये आणि  जखमींना  50,000 रुपये  सानुग्रह अनुदान दिले जाईल.”