वैजापूर तालुक्यातील आघुर येथे विविध विकास कामांसाठी 23 लक्ष रुपयांचा निधी मंजूर ;आ.बोरणारे यांच्या हस्ते भूमीपूजन व लोकार्पण

वैजापूर ,१ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील मौजे आघूर येथे आमदार रमेश पाटील बोरनारे यांच्या स्थनिक विकास निधीतून व जिल्हा परिषदअंतर्गत मंजूर झालेल्या 23 लक्ष रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आ. बोरणारे यांच्याहस्ते आज झाले.

आघोरेश्वर महादेव मंदीर सभा मंडप बांधकाम ( 7 लक्ष रुपये) कामांचे भूमिपूजन, व्यायामशाळा  साहित्याचे लोकार्पण (10 लक्ष रुपये), गावअंतर्गत सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्ता (4 लक्ष रुपये) कामांचे लोकार्पण, धोबीघाट (2 लक्ष रुपये) कामांचे भूमिपूजनअशा एकुण 23 लक्ष रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे आ.बोरणारे यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी आ.रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेरभाई, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे यांची भाषणे झाली. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, जिल्हा परिषद सदस्य दिपकभाऊ राजपूत, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, बाळासाहेब पाटील जाधव, उपतालुकाप्रमुख कल्याण पाटील जगताप, मोहन पाटील साळुंके, माजी उपसभापती सुनिल काका कदम, भाऊसाहेब पाटील गलांडे, पंचायत समिती सदस्य मयुर राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रास्ताविक व सुत्रसंचलन ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब पाटील आव्हाळे यांनी केले.

कार्यक्रमास शिवसेनेचे विभागप्रमुख प्रकाश पाटील मतसागर, उपविभागप्रमुख अशोक हाडोळे, मल्हारी पठाड़े, युवासेना उपतालुकाप्रमुख दादासाहेब पाटील आव्हाळे, विठ्ठल पाटील म्हस्के, अशोक पाटील कदम, सरपंच विक्रम आव्हाळे, गणेश पाटील इंगळे, संजय राजपूत, अमित इंगळे, सुरेश आव्हाळे, बाबासाहेब आव्हाळे, दत्तु पाटील आव्हाळे, दादासाहेब आव्हाळे, दिलीप डूबे, अनिरुद्ध आव्हाळे, संजय आव्हाळे, सुरेश पाटील आव्हाळे, विजय आव्हाळे, साईनाथ आव्हाळे, संतोष आव्हाळे, मोहन पाटील आव्हाळे, आबासाहेब पाटील आव्हाळे, मधुकर पाटील आव्हाळे  यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.