वैजापूर कांदा मार्केटमध्ये कृषिदिनानिमित्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार

वैजापूर ,१ जुलै  /प्रतिनिधी :- महाराष्ट्र कृषिदिनानिमित्त वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये गुरुवारी (ता.1) कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रगतशील शेतकरी बाबासाहेब पाटील वैद्य, शिवाजी कऱ्हाळे, सचिन साठे आदी शेतकऱ्यांचा पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कांदा व्यापारी रवि तांबे, संतोष वगदे, सुदाम डिके, सागर राजपूत, विशाल गायकवाड, माधव बावचे, रमेश शिंदे, राजू व्यवहारे, आमिर शेख, विकास सोमवंशी, बाजार समितीचे सी.ए.मते, शेख अजीम, योगेश मगर, ज्ञानेश्वर चव्हाण, निलेश खंडागळे यांच्यासह कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.