वैजापूर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा : 800 मीटर धावणे स्पर्धेत जरुळ शाळेचा विद्यार्थी जगदीश बागुल पहिला

वैजापूर, ८ डिसेंबर / प्रतिनिधी :- वैजापूर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत वैजापूर शिक्षण प्रसारक संस्था संचलित माध्यमिक विद्यालय जरूळ शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी जगदीश शिवाजी बागुल याने 800 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवला. त्याच्या या यशाबद्दल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.व्ही.जी.शिंदे,उपाध्यक्ष ऍड. आसाराम पाटील रोठे, सचिव ऍड. प्रवीण साखरे, शाळेचे मुख्याध्यापक तांबे, शिक्षक सय्यद मकसूद, बागुल, पवार, श्रीमती संत यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी तसेच गावकऱ्यांनी त्याचे खूप कौतुक केले.