वैजापूर न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीच्या नाम फलकाचे न्या. मोहियोद्दीन शेख यांच्या हस्ते अनावरण

वैजापूर,२१ जुलै /प्रतिनिधी :- वैजापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात 13 ऑगस्ट 2022 रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आले आहे. या निमित्ताने जिल्हा न्यायाधीश एम.ए.मोहियोद्दीन शेख यांच्या हस्ते राष्ट्रीय लोक अदालतीच्या नामफलकाचे अनावरण गुरुवारी करण्यात आले.

या प्रसंगी दुसरे जिल्हा न्यायाधीश डी.एम.आहेर, न्यायाधीश पी.पी. मुळे, दिवाणी न्यायाधीश आर.एन.नेरलीकर, दिवाणी न्यायाधीश आर.एम.करडे, श्रीमती आर.इन.मर्क, न्यायदंडाधिकारी श्रीमती एस.के.खान, श्रीमती व्ही.आर. कुलकर्णी, श्रीमती डी.एम.पवार यांची  प्रमुख उपस्थिती होती.
वकील संघाचे अध्यक्ष ॲड. किरण त्रिभुवन, उपाध्यक्ष ॲड.व्ही.जी. वाघ, सचिव वैभव ढगे, सहायक सरकारी अभियोक्ता नानासाहेब जगताप, ॲड.पी.एम जगताप, ॲड. के. बी.कदम, ॲड. आर.एस. हरिदास ॲड. एस. एस. ठोळे ॲड.पी.एस. साखरे, ॲड. सोपान पवार, ॲड. आर. पी. बोडखे, ॲड. राजु शिंदे ॲड. योगेश थावरे, ॲड. एच. एम. पठाण ॲड, मझहर बेग, ॲड. संतोष जेजुरकर, ॲड.आर.डी. सिरसाठ, ॲड. नवनाथ गायकवाड, ॲड. सुभाष खैरनार, ॲड.पी.एच पवार ॲड. सचिन जानेफळकर ॲड सवाई ॲड संदीप डोंगरे, ॲड महेश कदम ॲड.दत्तु जाधव, ॲड.संजय बत्तीसे, ॲड. राफे हसन, ॲड. सविता पाटणी यावेळी हजर होते.

या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये पोटगी, धनादेश सबंधित केसेस एल आर चे केसेस न्यायालयात दाखल पुरावा केसेस, मोटार वाहन अपघातसंबंधी दाखल केसेस नगर परिषद मोफत घर व नळ पट्टी सबंधित केसेस तडजोडीने मिटविण्यात येतील. याकरिता जास्तीत जास्त केसेस, वाद या दिवशी सबंधित पक्षकार व केसेस मधील विधिज्ञ यांनी हजर रहावे असे आव्हान जिल्हा न्यायाधीश एम.मोहिउद्दीन शेख व वकील संघाचे अध्यक्ष किरण त्रिभुवन यांनी केले आहे.