नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून 33 हजार 576 क्यूसेस विसर्ग ; गोदावरी पुन्हा दुथडी भरून वाहू लागली

वैजापूर,१७ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने नाशिक जिल्हयातील धरणे तुडूंब भरली असून नवीन पाण्याची आवक वाढल्याने धरणांतून विसर्ग करण्यात येत आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीपात्रात शनिवारी (ता.17) रात्री नऊ वाजता 33 हजार 576 क्यूसेसने विसर्ग करण्यात येत होता. नागमठाण केटीवेअर मधून रात्री दहा वाजता 41 हजार क्यूसेस विसर्ग सुरू असून गोदावरीतून 1 लाख 13 हजार 184 क्यूसेसने जायकवाडीत विसर्ग करण्यात येत आहे. मोठ्याप्रमाणात विसर्ग सुरू असल्याने गोदावरी पुन्हा दुथडी भरून वाहू लागली आहे.


नाशिक भागात तसेच दारणा, गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. धरणात मोठ्याप्रमाणात पाण्याची आवक सुरू असून धरणे तुडूंब भरल्यामुळे  दारणातून 10 हजार 562 क्यूसेस,मुकणेतून 1 हजार 486 क्यूसेस,कडवातून 7 हजार 632 क्यूसेस, वालदेवीतून 407 क्यूसेस, गंगापूरमधून 1 हजार 608 क्यूसेस, आळंदीतून 446 क्यूसेस, भोजापूरमधून 2 हजार 800 क्यूसेस, पालखेडमधून 6 हजार 824 क्यूसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

या सर्व धरणांतून 31 हजार क्यूसेस तसेच निफाड भागातील पावसाचे पाणी असे एकूण पाणी नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यात दाखल होत असल्याने  या बंधाऱ्यातून गोदावरी नदीच्या पात्रात आज रात्री आठच्या सुमारास 33 हजार 576 क्यूसेसने विसर्ग करण्यात येत होता.

दि.17/09/2022, रात्री 9.00 वा.

1) प्रवरा नदी – अ) भंडारदरा धरण विसर्ग – 5,538 क्युसेक. ब) निळवंडे धरण विसर्ग – 10,785 क्युसेक. क) ओझर बंधारा विसर्ग – 19,945 क्युसेक.

2) गोदावरी नदी – नांदूर मध्यमेश्‍वर बंधारा विसर्ग – 33,576 क्युसेक.

3) भिमा नदी – दौंड पूल विसर्ग – 1,29,295 क्युसेक.

4) घोड नदी – घोड धरण विसर्ग – 38,010 क्युसेक.

5) गोदावरी नदी – जायकवाडी धरण विसर्ग – 1,13,184 क्युसेक.

6) मुळा नदी – मुळा धरण विसर्ग – 10,000 क्युसेक.

7) कुकडी नदी – येडगाव धरण – 6,300 क्युसेक.