ठाकरे कुटुंब व शिवसेना हेच आपले पंढरपूर आणि पांडुरंग – शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

पैठण, गंगापूर, वैजापूर येथे आढावा बैठक

औरंगाबाद,२१ जुलै /प्रतिनिधी :- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवडता बालेकिल्ला म्हणून औरंगाबादला ओळखले जाते. आता व यापूर्वी अनेकांनी पक्ष सोडला आहे. पक्ष मात्र दुपटीने वाढला, गद्दार मात्र संपले आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंब व शिवसेना हेच आपले पंढरपूर आणि पांडुरंग असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा शिवसंवाद दौरा आयोजित केला आहे. त्या अनुषंगाने पैठण, गंगापूर, वैजापूर येथे आढावा बैठक पार पडली.यावेळी शिवसेना मराठवाडा सचिव ऍड. अशोक पटवर्धन, शिवसेना जिल्हाप्रमुख आंबादास दानवे, युवासेना विस्तारक मंदार चव्हाण आदींनी मार्गदर्शन केले.बैठकीस युवासेना जिल्हा युवाधिकारी शुभम पिवळ, मच्छिंद्र देवकर पाटील, तालुकाप्रमुख मनोज पेरे, सचिन आणि, उपजिल्हाप्रमुख अविनाश गलांडे पाटील, भाऊ सांगळे, कृष्णा पाटील डोणगावकार, संजय निकम, ऍड. आसाराम रोठे, मनाजी मिसाळ, रमेश सावंत, अशोक धर्मे, भाग्येश गंगवाल, तालुका युवाअधिकारी ऋषिकेश धाट, विकास गोर्डे, अरविंद नाहटा, भाऊसाहेब गलांडे, मोहन साळुंके, घनश्याम वाणी, मुरलीनाना थोरात, यशवंत मगर, रमेश हडोळे, सुरेश आल्हाट, उमेश शिंदे, विठ्ठल डमाळे पाटील, अक्षय साठे, राजू वाणी, संदीप वाणी, अजय वाणी, बाबासाहेब महाजन, अनिल वाणी, अरविंद साळुंके, राहूल साळुंके, संकेत वाणी, लिमेश वाणी, रावसाहेब मोटे, गोरख गावंडे, उध्दव तांबे, भरत तांबे, अनिल नाव्हले, मोहन वाणी आदींसह पैठण, गंगापूर रत्नपूर, वैजापूर तालुक्यातील पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.