​काँग्रेसतर्फे लबाड राज्य सरकारवर ११ डिसेंबरला हल्ला बोल मोर्चा 

हल्ला बोल मोर्चात ​जालना जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- राजाभाऊ देशमुख

जालना,७ डिसेंबर/ प्रतिनिधी :-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली ​११  डिसेंबर 2023 सोमवार रोजी ​नागपूर  येथे लबाड राज्य सरकारवर हल्ला बोल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्षा​चे  कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

राजाभाऊ देशमुख

राज्यात अवकाळी पावसामुळे आतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना राज्य सरकारने ताबडतोब मदतीचा हात द्यावा ही प्रमुख मागणी असून यावर्षीच्या खरीप हंगामाकरीता सरसकट दुष्काळ जा​हीर करून एकरी ​५० हजार रूपये देण्यात यावे, विनाअट सर्व पिकाकरीता शतकऱ्यांना पिक विमा मंजुर करण्यात यावा, विद्युत लोडशेडींग पुर्णतहा बंद करण्यात यावी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रलंबित शिष्यवृत्ती त्वरीत अदा करण्यात यावी, राज्यातील रिक्त शिक्षकांचे पदे तात्काळ भरण्यात यावीत आदि मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने ​११ डिसेंबर सोमवार रोजी सकाळी ​११ वाजता दिक्षा​भूमी ते मॉरीश कॉलेज टि पॉईंट नागपूर येथून काढण्यात येणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व तसेच शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सामिल व्हावे असे आवाहन जालना जिल्हा ग्रा​मीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा आ. कैला​स गोरंट्याल, जालना जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, माजी ​आमदार  सुरेशकुमार जेथलिया, प्रदेश प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील, कल्याण दळे, माजी जिल्हाध्यक्ष आर. आर. खडके, वरीष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र राख, राम सावंत, वैभव उगले, आण्णासाहेब खंदारे, वसंत जाधव, गणेश राऊत आदिंनी केले आहे.