वैजापूर शहरातील आनंदनगर भागात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा ; 30 लाखांचा मुद्देमाल जप्त, 19 जणांविरुद्ध कारवाई

वैजापूर ,​२​ जून/ प्रतिनिधी :-शहरातील आनंदनगर भागात राहत्या घरात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी गुरुवारी (ता.01) सायंकाळी छापा टाकून पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या 19 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम व साहित्य असा जवळपास 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ही करवाई करण्यात आली.

पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील आनंदनगर भागात एका राहत्या घरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांना मिळाली होती. या माहितीवरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक बनसोड,पोलिस उपनिरीक्षक श्रीराम काळे, पोलिस कॉन्स्टेबल गोलवाल, वर्षा गाडेकर, सविता मोटे, शिवनाथ सरोदे, अमोल मोटे, मोना पवार, संजय घुगे, गोपाल जोनवाल यांच्या पथकाने छापा टाकून पत्याचा जुगार खेळणाऱ्या ऋषीकेश राऊत (25 वर्ष,रा.लाडवाणी गल्ली,वैजापूर),अफरोज शेख जब्बार (42 वर्ष,रा.येवला), सुनील हरिभाऊ गिरी (50 वर्ष,देशपांडे गल्ली, वैजापूर), शेषराव नवले (48 वर्ष,रा.खोपडी,कोपरगांव), शकील शरीफ पठाण (40 वर्ष, रा.लाडगांव रोड,वैजापूर), मनोहर ताराचंद घोलप (30 वर्ष रा.मनमाड), राजू शिंदे (45 वर्ष र.राहुरी), रवि मच्छिंद्र मुळे (29 वर्ष, इंगळे गल्ली,वैजापूर), संजू कचरू जाधव (25 वर्ष, रा.महालगांव), कैलास नारायण लुटे ( 56 वर्ष, रा.कोल्हार), चंद्रपाल राजपूत (रा.आनंदनगर, वैजापूर), शेख फैय्याज शेख गणी (36 वर्ष, रा.दर्गाबेस, वैजापूर), बाबासाहेब लक्ष्मण गायकवाड (38 वर्ष, फुलवाडीरोड, वैजापूर), अशोक बापूराव टिळेकर (39 वर्ष रा.पोलीस स्टेशनरोड, वैजापूर),सुनील लोटके (45 वर्ष, रा.श्रीरामपूर)हिमेश गोपालदास रामैय्या (36 वर्ष, रा.परदेशी गल्ली, वैजापूर), दयानंद जावळे (52 वर्ष,रा.येवला), संतोष पवार(43 वर्ष,रा.राहुरी), निलेश गोपीनाथ लोंढे(33 वर्ष, रा.येवला) व दीपक रमेश इंगळे (30 वर्ष, रा. राहुरी) या 19 जणांना ताब्यात घेतले व 79 हजार 637 रुपये रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.