रोटेगाव एमआयडीसी सुरू करण्यासंदर्भात आ.बोरणारे यांची उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर बैठक

वैजापूर,२२ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-गेल्या तीस वर्षांपासून प्रलंबित असलेला वैजापूर तालुक्यातील रोटेगाव औद्योगिक वसाहतीचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात आ.रमेश पाटील बोरणारे यांची गुरुवारी (ता.22) राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर मंत्रालयात बैठक झाली.

Image


रोटेगांव औद्योगिक वसाहत सुरू करण्यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या या बैठकीस उद्योगमंत्री उदय सामंत, आ.रमेश पाटील बोरणारे, उद्योग विभागाचे सहसचिव संजय देगावकर, एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी पी.डी. मलीकनेर व सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Image

वैजापूरतालुक्याच्या विकासाच्यादृष्टीने रोटेगाव एमआयडीसी ला 1993 मध्ये मंजुरी देण्यात आली. यासाठी तालुक्यातील वैजापूर शहरालगत असलेल्या रोटेगाव,आघुर, जरुळ व लोणी बुद्रुक या चार गावांतील मिळून 1172 हेक्टर जमीन संपादित करण्यात आलेली आहे. 

Image

ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी एमआयडीसीत गेल्या त्यांना अधिकचा मावेजा मिळावा यासाठी काही शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. परिणामी औद्योगिक वसाहतीचा प्रश्न रखडला आहे.औद्योगिक वसाहतीमुळे तालुक्यातील विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र गेल्या तीस वर्षांपासून औधोगिक वसाहतीचा प्रश्न रेंगाळत पडला आहे.