वैजापूर तालुक्यात दहावीचा निकाल ९४.५२ टक्के

मुलांपेक्षा मुलीच सरस

वैजापूर ,​२​ जून/ प्रतिनिधी :- दहावीच्या परीक्षेत वैजापूर तालुक्यातील ९४.५२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाही बोर्डाच्या परीक्षेत मुलांपेक्षा मुली सरस ठरल्या आहेत. दहावीच्या परीक्षेसाठी दोन हजार ५१० मुले व दोन हजार ६४ मुली अशा एकूण चार हजार ५७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सुमारे चार हजार ५३३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परिक्षेत दोन हजार २९३ मुले व एक हजार ९९२ असे चार हजार २८५ विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.५३ टक्के असुन मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण तब्बल ९६.९३ टक्के आहे. त्यामुळे यंदाही मुलींनीच बाजी मारल्याचे निकालावरून दिसत आहे. 

वैजापूर तालुक्यातील ६३ केंद्रावरून घेण्यात आलेल्या या परिक्षेत एक हजार ६८८ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले असुन एक हजार ६७५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. शहरातील काही शाळांचे निकाल पुढीलप्रमाणे: जिल्हा परिषद कन्या प्रश्नाला (७५ टक्के), न्युज हायस्कुल (८६.८३ टक्के), सेंट मोनिका इंग्लिश स्कुल (१०० टक्के), उर्दु गर्ल्स हायस्कुल (१०० टक्के), नुतन कन्या विद्या मंदिर (१०० टक्के), हल्क-ए- दवानायक उर्दु माध्यमिक स्कुल (९७.३६ टक्के), जिल्हा परिषद हायस्कुल (९७.९५ टक्के), जिल्हा परिषद हायस्कुल, खंडाळा (८७.०१टक्के), विद्या सागर कन्या प्रशाला, खंडाळा (८७.३० टक्के), जिल्हा परिषद हायस्कुल, लासुरगाव (८७.७३ टक्के), जिल्हा परिषद हायस्कुल, मनुर (९४.८०टक्के), जिल्हा परिषद हायस्कुल, परसोडा (१०० टक्के), जिल्हा परिषद हायस्कुल, शिऊर (८४.७४ टक्के), संत बहिणाबाई कन्या प्रशाला, शिऊर (९३.६७ टक्के), जिल्हा परिषद हायस्कुल,शिवराई (९६.८२ टक्के), जिल्हा परिषद हायस्कुल, वाकला (९० टक्के), जयहिंद हायस्कूल बाभुळगाव (९८.४१ टक्के), विनायक विद्यालय लोणी (८०.६८ टक्के), पारेश्वर विद्यालय पालखेड (९३.५८ टक्के), संत जोसेफ विद्यालय माळीघोगरगाव (९१.२२ टक्के), न्यु हायस्कूल धोंदलगाव (९५.५७ टक्के), न्यु हायस्कूल लाडगाव (९४.३७ टक्के), न्यु हायस्कूल, महालगाव (९८.३८ टक्के).