वैजापूर पालिकेच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पंचधातु पुतळ्याचे शनिवारी अनावरण

वैजापूर,३१ डिसेंबर /प्रतिनिधी :- वैजापूर पालिकेच्यावतीने शहरातील मुख्य चौकात उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पंचधातू पुतळ्याचे अनावरण नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी यांच्याहस्ते शनिवारी होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.रमेश पाटील बोरणारे हे असतील.

Displaying IMG_20211230_221739.jpg


वैजापूर शहरातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.752 वरील मुख्य चौकात पालिकेच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अनेकवर्षांपूर्वी उभारण्यात आलेला आहे. या पुतळ्याचे नूतनीकरण करण्यात आले असून पंचधातूंचा नवीन पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या या नवीन पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण सोहळा शनिवारी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे.

जुने बसस्थानक, ठक्कर बाजार वैजापूर येथे आयोजित या कार्यक्रमास काँग्रेसचे जेष्ठनेते भाऊसाहेब पाटील – ठोंबरे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी नगराध्यक्ष साबेरखान, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य एकनाथराव जाधव. मा.नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, माजी उपनगराध्यक्ष शेख अकिल सेठ, पुतळा समितीचे सदस्य सी.बी.थोरात,विठ्ठल गबाजी साळवे, गोपीनाथ थोरात  यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर दुपारी 12 वाजता धम्मदेशनाचा कार्यक्रम होईल.पू.भदंत उपगुप्त महास्थवीर (पूर्णा), पू.भन्ते अश्वजीत थेरो (औरंगाबाद), पू.भन्ते यशोदीप थेरो (औरंगाबाद), पू. भन्ते रेवत साकेगांव (जालना) व पू.भन्ते आनंद साकेगांव (जालना) यांचा त्यात सहभाग असेल.या पुतळा अनावरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी बी.यु.बिघोत यांनी केले आहे.