वैजापुरात मोहम्मद पैगंबर जयंती उत्साहात ; ईद-ए.मिलादुन्नबी निमित्त जुलूस-ए-मोहम्मदी

जाधवगल्ली येथे खान ग्रुपतर्फे अन्नदानाचा कार्यक्रम

वैजापूर,९ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती वैजापूर शहरात रविवारी( ता.09) उत्साहात साजरा करण्यात आली. यानिमित्ताने अन्नदान करून शहरातून जुलूस-ए- मोहम्मदी मिरवणूक काढण्यात आली.

इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्म दिन हा ईद-ए-मिलादुन्नबी दिन म्हणून साजरा होतो. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून हा दिन वैजापूरात मर्यादित रुपात साजरा केल्या जात होता. मात्र यावर्षी मोठ्या उत्साहात व आनंदात मोठ्या गर्दीने मोहम्मद पैगंबर जयंती साजरी करण्यात आली.

सकाळी दहा वाजता शहरातील रजा मस्जिदपासून फतेह चौकमार्गे, लाडगाव रोड, डेपो रोड, आंबेडकर चौक स्टेशन रोड, पोलीस स्टेशनमार्गे दर्गा येथे विसर्जित करण्यात आला. या जुलूस मध्ये रथात मौलवी यांना बसविण्यात आले होते तसेच लहान मुले, युवक वर्ग यांचा मोठा सहभाग होता. युवावर्ग मोठया उत्साहात घोषणा देत होते तर संगीत तालावर धार्मिक गीते वाजविण्यात  येत होती.

या मिरवणुकीत माजी नगराध्यक्ष साबेर खान, माजी उपनगराध्यक्ष मजीद कुरेशी, हाजी अकील शेठ, हिकमत सय्यद, काझी हाफीजुद्दीन, मलिक काझी, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, मौलाना जुबेर, तय्यब रशीद, ऍड.रियासतअली, ऍड.यासरअली, ऍड.राफे हसन, गयास मामू, खलील मिस्तरी, सज्जादअली, कादरअली, ऍड. सईदअली, सय्यद रहान अली, सुलतान खान, काझी लईक इनामदार, रशीद मास्टर, अल्ताफ बाबा यांच्यासह शहरातील मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जुलूस शांततेत संपन्न झाला.

जाधव गल्ली येथे खान ग्रुपतर्फे अन्नदान

मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त शहरातील खान ग्रुपतर्फे जाधवगल्ली येथे कार्यक्रम झाला.यावेळी मौलाना जुबेर यांचे प्रवचन झाले. शहरातील असंख्य नागरिकांनी प्रसादाचा लाभ घेतला. आ.रमेश पाटील बोरणारे, मा. नगराध्यक्ष साबेरखान अमजदखान, माजी उपनगराध्यक्ष हाजी अकिल सेठ, मजीद कुरेशी, महेश पाटील बुणगे आदींची या कार्यक्रमास उपस्थिती होती. खान ग्रुपतर्फे गेल्या 25 -30 वर्षांपासून पैगंबर जयंतीनिमित्त अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या अन्नदान कार्यक्रमासाठी खान ग्रुपचे ताहेर खान (सुलतान), रहीम खान, शेख अहमद, युसूफ खान, आवेज खान, फैज खान, इम्रान खान, अमन खान, शेख उबेद, हाजी नसीरभाई, सैफ खान, राजेक खान व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला.