शिऊर येथे संत तुकाराम महाराज आश्रम बांधकामाचे भूमीपूजन

वैजापूर ,​२​ जून/ प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील संत तुकाराम महाराज आश्रम बांधकामासाठी  ४० लाख रुपयांचा निधी आ.रमेश पाटील बोरणारे यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला असून या बांधकामाचे भूमीपूजन हभप अनिल महाराज बार्शीकर यांच्याहस्ते व आ.रमेश पाटील बोरणारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

तसेच श्रीक्षेत्र शिऊर येथे वै.श्री.ह.भ.प.वैराग्यमूर्ती गुरुवर्य रंगनाथस्वामी महाराज भिंगारे (बाबा) यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त ह.भ.प.अनिल महाराज बार्शीकर यांची यांचे काल्याचे किर्तन माध्यामातून सेवा पार पडली. या किर्तनाप्रसंगी आ. बोरणारे यांनी उपस्थित राहून महाराजांचे आशीर्वाद घेतले.

यावेळी संत तुकाराम महाराज आश्रम आ.बोरणारे यांनी मंजुर करून आणलेल्या 40 लक्ष रुपये निधीच्या कामांचे भूमिपूजन ह.भ.प.अनिल महाराज बार्शीकर यांच्याहस्ते करण्यात आले. 

संत तुकाराम महाराज आश्रमाचे संस्थापक ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली मधाने, ह.भ.प ठूबे शास्त्री महाराज, ह.भ.प.भोपळे शास्त्री महाराज, ह.भ.प. चन्ने महाराज, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, वैजापूर बाजार समितीचे सभापती रामहरीबापू जाधव, माजी सभापती भागीनाथ मगर, शहरप्रमुख पारस घाटे, बाजार समितीचे संचालक गोरख आहेर, राजू भाऊ निकम, बाळासाहेब जाधव, बाबासाहेब दरेकर यांच्यासह परिसरातील भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.