व्यसन व तणावमुक्ती ही काळाची गरज – भाजप जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी

वैजापूर,२८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-​ आजचा तरुण हा उद्याचा या महान राष्ट्राचा खरा आधारस्तंभ आहे. कृतिशील युवक राष्ट्राचे भवितव्य आहे मात्र आज तरुण वर्ग विविध व्यसनांच्या आहारी गेलेला आहे त्यांना वेळीच  सावरण्यासाठी व्यसनमुक्ती, तणावमुक्ती केंद्रातून मानसशास्त्र दृष्टया समुपदेशन करण्याची नितांत गरज आहे. वैजापूरातील तणावमुक्त आरोग्य पॉईंट निश्चित तरुणांचे समुपदेशन करून व्यसनांच्या प्रवाहात वाहत असलेल्या तरुण वर्गाला योग्य दिशा दाखवेल असे प्रतिपादन भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी नुकतेच एका कार्यक्रमात केले.

सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत म्हणाले की प्रचंड तणावाखाली आजचा युवक आत्महत्या मार्ग अवलंबित आहे. यासाठी आई-वडिलांनी आपल्या मुलांना समजावून योग्य समूपदेशन करण्याची गरज आहे या प्रसंगी मनसेचे सुनील गायकवाड, बाळासाहेब घंगाळे, काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत सदाफळ, पालिकेचे शिक्षण सभापती दशरथ बनकर, डॉ. संतोष गंगवाल, पारस घाटे, विलास म्हस्के, डॉ. प्रज्वल बागुल, ज्ञानेश्वर घोडके, महेश भालेराव, रमेश शिंदे, साहेबराव पडवळ यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीमती बागुल, डॉ.प्रज्वल बागुल यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. धोंडीराम राजपूत यांनी सूत्र संचलन केले तर साहेबराव पडवळ यांनी आभार मानले.