छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार ; वैजापूर येथे 1 नोव्हेंबरला पुरस्काराचे वितरण

वैजापूर,२८ऑक्टोबर /प्रतिनिधी :-जिजाऊ बहुउदेशीय सेवाभावी संस्था नागमठाण ता. वैजापूरच्या वतीने पुढील महिन्यातील एक नोव्हेम्बर मंगळवार रोजी येथील पंचायत समिती

सभागृहात छत्रपती शिवाजी राजे राष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून सामाजिक व राष्ट्रीय कार्यात अग्रेसर  असलेल्या नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते

प्रदान करण्यात येणार आहे. 

राज्यातील 51 कार्यकर्त्याव्यतिरिक्त राष्ट्रीयकार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आल्याची माहिती आयोजक तथा पोलिस  पाटील संघ औरंगाबादचे सचिव

सूर्यकांत रामदास मोटे पाटील यांनी  सांगितले. जिजाऊ सेवाभावी संस्था चे अध्यक्ष ऍड धनराज अंभोरे व सचिव संतोष नामदेव दौडे यांनी या पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. पुरस्कार वितरण आ.रमेश पाटील बोरणारे,नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, माजी नगराध्यक्ष साबेरखान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती मोटे पाटील यांनी दिली.