माझी चिंता करू नका.माझा पराभव मला खूप शिकवून गेला – पंकजा मुंडे यांचे गोपीनाथ गडावर वक्तव्य

बीड ,३ जून  /प्रतिनिधी :-माझी चिंता करू नका. मला सगळे विचारतात तुमचे भविष्य काय आहे. उद्या काय होणार आहे? तुम्हाला काय मिळणार आहे? याची मला खरंच चिंता नाही. दिलेल्या संधीचे सोने करणे हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत. माझ्या पराभवाचे देखील मला सोने करता आले, हा पराभव मला दिल्लीपर्यंत घेऊन गेला, असे प्रतिपादन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले.

May be an image of 5 people, people standing and flower

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी बीड येथील गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची प्रमुख उपस्थिती होती. कोरोना काळानंतर दोन वर्षांनंतर गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी शुक्रवारी मोठ्या प्रमाणात मुंडे समर्थकांनी गोपीनाथ गडावर उपस्थिती दर्शवली.

May be an image of 4 people, people standing and indoor

आपल्याला काय मिळेल आणि काय नाही मिळणार याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपल्याकडे जे आहे ते कसे आपल्याला बांधून ठेवता येईल, हे आपल्याला करायचे आहे, असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.दरम्यान सत्तेसाठी नाही पण गोपीनाथ मुंडे हे सत्यासाठी लढले, वंचितांच्या हितासाठी भल्या-भल्यांना भिडले. निर्भीड होती वाणी आणि करारी होता बाणा. हिमालयाला टक्कर दिली पण वाकला नाही त्याचा कणा, अशा गोपीनाथ मुंडेंना आपण आपला नेता मानतो. असेही यावेळी पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवले.

Image

दरम्यान यावेळी पंकजा मुंडे यांनी संकटांनो मी तुम्हाला शरण यावं एवढी तुमची औकात नाही. जीवनाच्या या रणांगणात पाय ठेवून मी ठाम उभी राहीन, एवढी ताकद माझ्या लोकांमध्ये आहे. सोसेल तुमचे वर्मी घाव तरी मी घायाळ होणार नाही, छाताडावर तुमच्या पाय देऊन समाजातील वंचितांसाठी लढण्यासाठी मी उभी राहीन, तुम्हाला कसे ते कळणार देखील नाही, असे देखील पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवले.

May be an image of 4 people and people standing

“सत्तेसाठी नाही पण गोपीनाथ मुंडे सत्यासाठी लढला, वंचितांच्या हितासाठी भल्या-भल्यांना भिडला. निर्भिड होती वाणी आणि करारी होता बाणा. हिमालयाला टक्कर दिली पण वाकला नाही त्याचा कणा.” अशा गोपीनाथ मुंडेंना आपण आपला नेता मानतो. माझ्या जीवनात एवढंच सांगेन, “संकटांनो मी तुम्हाला शरण यावं एवढी तुमची औकात नाही. जीवनाच्या या रणांगणात पाय ठेवून मी ठाम उभी राहीन, एवढी ताकद माझ्या लोकांमध्ये आहे. सोसेल तुमचे वर्मी घाव तरी मी घायाळ होणार नाही, छाताडावर तुमच्या पाय देऊन समाजातील वंचितांसाठी लढण्यासाठी मी उभी राहीन, तुम्हाला कसं ते कळणार देखील नाही.” असंही यावेळी पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवलं.

May be an image of 11 people and people standing

“कोणी कितीही मला नाव ठेवलं की, ताई तुम्हाला हे जमलंच नाही. मला नाही जमलं कुणाचं हृदय तोडणं, मला नाही जमलं लोकांना पोसणं, पैसे खाऊ घालणारे लोक सांभाळणं. मला जमलं ते सामान्य माणासाशी नाळ जोडून ठेवणं. त्यामळे सत्व सोबत ठेवून तत्वाने काम करून आपल्या मनात लोकांच्या बाबतीत ममत्व पाहिजे. हे ममत्व शिवराजसिंह चौहान यांना इथपर्यंत घेऊन आलं आहे. आज त्यांच्या येण्यामुळे मी खूप आनंदी झाले आहे. दु:खाच्या दिवशी माझ्या चेहऱ्यावर हास्य आलं आहे. मी त्यांचे स्वागत करते आणि महाराष्ट्र सरकारला देखील अशाप्रकारची बुद्धी लाभो, अशाप्रकारची प्रेरणा लाभो. आमच्या शिवराजसिंह चौहान यांचं त्यांनी अनुकरण करून या महाराष्ट्रातील समस्त ओबीसींवर आलेल्या संकटातून त्यांना बाहेर काढावं. ओबीसीचे मोर्चे, मेळावे घेणं आणि ओबीसीचा मी नेता आहे, हा नेता आहे यासाठी ओबीसी आरक्षण आम्हाला नकोय. या ओबीसीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आम्हाला आरक्षण सुरक्षित पाहिजे. म्हणून मला वाटतं की आजच्या या दिवशी नक्कीच चांगली बातमी या सरकारकडून येईल आणि शिवराजसिंह चौहान यांचं सरकार देखील त्यांना मदत करेल, हा विश्वास मी व्यक्त करते.”

“सूर्योदय पण कधी काळा असतो का? असं जर कोणी मला विचारलं तर ३ जूनचा सूर्य काळा दिवस घेऊन जन्मला असं जर मी म्हणाले तर ते वावगं ठरणार नाही. रामायण धर्म सांगते तर महाभारत कर्म सांगते. पण कर्माशिवाय धर्म नाही आणि धर्माशिवाय कर्म नाही. धर्म म्हणजे हिंदू-मुस्लीम नसून, धर्म म्हणजे मानवता धर्म आहे हे आम्हाला गोपीनाथ मुंडेंनी शिकवलं आहे.”

May be an image of 5 people and people standing
गोरक्षक पद्मश्री सय्यद शब्बीर
May be an image of 6 people, people standing and indoor
कविता वाघ

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठव्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मध्य प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी त्यांनी मुंडे समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले.

Image
सामाजिक कार्यकर्त्या प्रीती पाटकर

या कार्यक्रमात विविध क्षेत्रात वंचित,पीडित घटकांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा ‘संघर्षदिन सन्मान’ म्हणून सम्मान करण्यात आला. उद्योगपती मिलिंद कांबळे,गोरक्षक पद्मश्री सय्यद शब्बीर,सामाजिक कार्यकर्त्या प्रीती पाटकर,कविता वाघ यांचा गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते सन्मान केला.

Image
उद्योगपती मिलिंद कांबळे

तत्पूर्वी सकाळी रामायणाचार्य ह.भ.प रामराव महाराज ढोक यांचे सुश्राव्य किर्तन श्रवण केले व लोकनेत्याला अभिवादन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मुंडे प्रेमींना महाप्रसाद वाटप केला.