चिंचडगाव येथे १ कोटी ८३ लाख रुपये निधीच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण

वैजापूर ,२४ मे  / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथे शासनाच्या विविध योजनेतून मंजूर झालेल्या १ कोटी ८३ लाख रुपये निधीच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण बुधवारी (ता.24) प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. आ.रमेश पाटील बोरणारे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

 

या कार्यक्रमास ह.भ.प. राजेश्वरगिरी महाराज, उपनगराध्यक्ष साबेरभाई, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, बाजार समितीचे सभापती रामहरीबापू जाधव, उपसभापती शिवकन्याताई पवार, लासूरस्टेशन बाजार समितीचे उपसभापती अनिल चव्हाण, के.टी.तांबे, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र साळुंके, माजी तालुकाप्रमुख खुशालसिंग राजपूत, माजी सभापती अंकुश पाटील हिंगे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन साहेबराव पाटील औताडे, शहरप्रमुख पारस घाटे, माजी उपसभापती मधुकर पाटील पवार, युवासेना जिल्हाप्रमुख भरत  कदम, तालुकाप्रमुख श्रीराम गायकवाड, बाजार समितीचे संचालक कल्याण पाटील जगताप, गोरख  आहेर, गणेश इंगळे, प्रशांत त्रिभुवन, प्रविण पवार, उपतालुकाप्रमुख महेश बुणगे, किरण तांबे, नानासाहेब थोरात, परसराम मोईन, उपविभागप्रमुख हरिभाऊ साळुंके, सुनील कारभार, संभाजी डुकरे यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.