वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त विविध कार्यक्रम

वैजापूर ,१२ जानेवारी / प्रतिनिधी :- येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिनानिमित  गुरुवारी (ता 12 ) जिल्हा एड्स नियंत्रण पथक औरंगाबाद, उपजिल्हा रुग्णालय वैजापूर व एन.एस.एस.छात्र यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रम पार पडले.

जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ,दयानंद मोतीपवळे, औरंगाबाद, वैजापूर वैद्यकीय अधीक्षक डॉ. आशिष पाटणी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी साधना गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात  राष्ट्रीय युवा दिनावर धोंडीरामसिंह राजपूत यांनी व्याख्यान देऊन युवा वर्गाने आपल्या ज्ञान व कौशल्याचा उपयोग रचनात्मक व विधायक कार्यासाठी करावा असे विशद केले. विजय पाटील यांनी एच.आय.व्ही.एड्स बाबत युवक वर्गाला माहिती दिली. श्याम उचित व मंगेश मापारी यांनी कोविड लसीकरण केले.विद्यार्थी फेरी काढून जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमास वरिष्ठ वर्गाचे युवक – युवती उपस्थित होते. कार्यक्रम अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.दादासाहेब साळुंके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हा रुग्णालयाचे  आय.सी.टी.सीचे समुपदेशक विजय पाटील, शशिकांत पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. आरंभी राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. या प्रसंगी रामेश्वर नारळे, आर.के.म्हस्के, श्री. दारूटे यांनी सहकार्य केले. शेवटी शशिकांत पाटील यांनी आभार मानले.