वैजापूर शहरातील लक्ष्मीनगर भागात गांजाची चोरटी विक्री ; एक किलो गांजा जप्त

वैजापूर ,२४ मे  / प्रतिनिधी :- वैजापूर शहरात नशील्या गांजा पदार्थाची चोरटी विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी शहरातील लक्ष्मीनगर भागात एका घरावर छापा टाकुन आठ हजार रुपये किमतीचा एक किलो गांजा, वजन काटा व इतर साहित्य असा सुमारे दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या प्रकरणी गणेश इंद्रराज गायकवाड (३५) यांच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात महिला पोलिस नाईक वर्षा गादेकर यांनी तक्रार दिल्यानंतर सहायक पोलिस उपनिरीक्षक वाल्मिक राऊत यांनी गुन्ह्याची कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी या करीत आहेत.